|| शब्देविण संवादू ||
तुम्हाला न
बोलता , कुठलीही भाषा अवगत नसताना समोरच्याशी संवाद साधता येतो का ? खरतर संवाद
साधायला विशिष्ट भाषेची गरज असतेच का ? आणि तो संवाद माणसांशी असेल तर ठीक ..पण तो
संवाद प्राणी,पक्षी किंवा वन्य प्राण्यांशी साधायचा असेल तर ? त्यातल्या त्यात
एखाद्या प्राण्याविषयी फारस ज्ञान नसेल तर ? कठीण आहे...पण अशक्य नाही..इथे गरज
असेल ती फक्त झपाटलेपणाची. तरच ते शक्य होत आणि मग त्या प्राण्याच्या वा पक्ष्याच्या
अंतरात शिरून त्याच्या मनात घर करता येत.कारण सध्याच्या जगात पूर्ण शुद्ध प्रेम हे
फक्त प्राणीच करू शकतात,
लहानपणी
उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीच्या घरी जाण्याचा योग यायचा.कारण तिथे एक माहूत त्याचा
हत्ती घेऊन यायचा..त्याच्या गळ्यात बांधलेली घंटी हळुवार त्याच्या अलगद चालीनुसार हलत
डुलत वाजत राहायची. घराच्या आत ती घंटी ऐकायला आली कि कळायचं कि हत्ती आला..ते
बघायला आम्ही सगळे अंगणात जात असायचो..तेव्हा तो धिप्पाड मोठा हत्ती, त्याची
हलणारी सोंड, त्याचे हलणारे सुपासारखे कान बघुन
खूप मजा वाटायची.त्याच्या शरीराकडे बघून वाटायचं कि, हा हत्ती आंघोळ करतो कि
नाही ? माहूत बोलायचा कमी आणि त्याला अंकुशाने टोचायाचा जास्त. तरीही तो हत्ती न
चिडता चालत राहायचा. हलत डुलत जाणारा हत्ती हळूहळू दूर जायचा..पण जाताना अनेक प्रश्न मागे सोडून जायचा.
हत्ती
काय,कसा,किती खात असेल? कुठे रहात असेल ? त्याची त्वचा अशी का असते ? तो चिडका आहे
कि प्रेमळ आहे ? शंकराने गणपतीला हत्तीचेच मुख का लावले असेल ? पण असे प्रश्न
विचारले कि मात्र समधानकारक उत्तर कधीच मिळत नव्हत. पण या सगळ्यात एक प्रश्न नेहमी
कायम राहायचा कि तो माहूत हत्तीशी काय बोलायचा ? त्याला माहुताच बोलण कळत का ? कळत
तर समजत का ? अनेक प्रश्न होते...उत्तरं नव्हती.
उत्तरं
असतात..फक्त ती तुमच्या पर्यंत पोहोचायला योग्य वेळ यावी लागते. आणि ती वेळ मुंबईला राहणाऱ्या माझ्या मिलिंद दादामुळे
आली. त्याच बोरीवलीहून ठाण्याला घर बदलण,
ज्या ठिकाणी घर घ्याव त्याच्या समोरच्या घरी राहणाऱ्या एका अवलीयाशी भेट होणे हा
एक चांगला संयोग होता. कारण याच अवलियाकडे माझ्या प्रश्नांची उत्तर होती.
आनंद शिंदे.......अस त्या अवलियाच नाव होत.मी एक
फोटोग्राफर म्हणून मिलिंद दादाने माझी त्यांची भेट घालून दिली. सुरुवातीला आमची काही
वेळ फोटोग्राफीवर चर्चा झाली,पण त्यानंतर एक अनोखा विषय सुरु झाला... “हत्ती”....सुरुवातीला मी म्हणलो ना कि , तुम्हाला न
बोलता , कुठलीही भाषा अवगत नसताना समोरच्याशी संवाद साधता येतो का ? तर येतो... आनंद शिंदे यांना हत्तींशी संवाद
साधता येतो. त्यांच्या अंतरात शिरता येत..आनंद
शिंदे सध्या भारतात नावाजलेले “ Elephant Whisperer ” , हत्तीमित्र म्हणून ओळखले जातात. पण हि ओळख
त्यांना सहज मिळाली नाही. आणि ते सहज शक्यही नव्हत. हत्ती आणि त्यांच्यात खरतर
फक्त एक ते दोन फुटाच अंतर होत.पण ते अंतर कमी करून त्याच्या अंतरात शिरायला आनंद
दादांना वयाची कितीतरी वर्ष खर्ची करावी लागली.१०-१० तास हत्तीच्या सानिध्यात रहाव
लागल. यासाठी त्यांना बऱ्याच लोकांनी वेडाही
म्हटले,पण हेच वेडेपण एक दिवस त्यांना हत्तीच्या अजून जवळ घेऊन गेल. हत्तिला समजून
घेण्यासाठी स्वतःच करियर पणाला लावाव लागल. आणि या सगळ्यात त्यांना साथ दिली ती
त्यांची पत्नी श्रिया पाटील यांनी.आणि २०१४ साली आनंदजींनी पत्रकारिता सोडून आपल
सर्व लक्ष हत्तींवर केंद्रित केल.
व्यवसायाने
फोटो जर्नलिस्ट असलेल्या आनंद शिंदे यांनी , नोव्हेंबर २००८ साली मुंबईवर झालेल्या भ्याड हल्ल्यात पत्रकार
म्हणून उत्तम कामगिरी केलीच, पण त्यानंतर २००९ ला मुंबईतल्या एका घटनेच्या वेळी
पोलिसांना केलेल्या मदतीसाठी त्यांना Godfrey ,Philips
Bravery Award – Gold Medal 2010 देण्यात आला. इतक सगळ सुरु असताना त्यांना
ऑफिसच्या कामासाठी एकदा केरळला पाठवण्यात आले. तिथे सगळेच त्यांच्यासाठी नवीन
होते. अशात एकदा त्यांना त्यांचे गुरु बंदीप सिंग यांचा फोन आला आणि बोलताना
त्यावेळी बंदीप सिंग फक्त इतकेच म्हणाले कि, ‘अगर केरलामे हो तो मुझे हाथी
दिखादो....”याच एका वाक्याने आनंदजींच्या आयुष्याची दिशाच बदलली. आणि हत्ती या
विषयाचा प्रवास सुरु झाला. केरळच्या प्रसिद्ध त्रिशूर फेस्टिवल मध्ये त्यांनी
पहिल्यांदा हत्तीचे फोटोशूट केले,,आणि त्यानंतर हत्ती खऱ्या अर्थाने त्यांना कळायला सुरुवात झाली.
आनंदजी
सांगतात कि , प्रचंड ताकदवान असलेला हत्ती मनाने मात्र अत्यंत मऊ आणि विनम्र असतो.
हत्ती प्रेम करतो तो त्याच्या आकारात..तुम्ही त्याला तुमच्या आकारानुसार ५० किलोने
प्रेम दिलेत तर तोही त्याच्या आकारानुसार अडीच हजार किलोने प्रेम परत देतो. आनंदजी यांच आणि हत्तींच नातं
खरतर शब्दांच्या पलीकडच आहे. जिथे दोन माणसातला संवाद हरवत चाललाय तिथे आनंदजी हत्तींशी
मराठीत बोलतात आणि हत्ती त्यांच्या भाषेत. आणि या प्रेमळ संवादच चक्र पूर्ण होत
असत. श्रिया वाहिनी सांगतात कि, हत्तींशी अमाप बोलणारे आनंद घरात मात्र शांत
असतात.कमी बोलतात. मग काय असेल असे कि जे दोघांनाही ( हत्ती आणि आनंदजी )
एकमेकांमधला संवाद समजून घ्यायला मदत करत. तर हत्तीं हा अतिशय बुद्धिमान आणि
प्रेमळ प्राणी आहे.हत्तीने तुम्हाला एकदा बघितले, तुम्ही त्याला एकदा का प्रेमाने
वागवले किंवा त्याला प्रेम दिले तर तो ते
आयुष्यभर लक्षात ठेवतो. आणि हेच प्रेम हाच जिव्हाळा बहुतेक हत्तींना आनंद्जींच्या
डोळ्यात आणि आनंद्जींना हत्तींच्या डोळ्यात दिसला.आणि न बोलता डोळ्यांनीच हि शब्देविण संवादूची प्रक्रिया होत राहिली.
आनंदजींच्या बऱ्याच मुलाखती, त्यांनी सांगितलेली हत्तींची
तपशीलवार माहिती युट्युबवर , अनेक मासिकात,वर्तमानपत्रात आहे. त्यात ते नेहमी
प्रकर्षाने सांगतात कि,हत्ती जेव्हा त्यांच्याशी बोलतात तेव्हा, जे त्यांना
बोलायचे आहे ते,बोलायच्या आधी त्यांच्या डोळ्यात दिसत.आणि तेच व्यक्त होत. बोलताना
हत्ती नेहमी एक विशिष्ट आवाज करतात त्याला
रम्ब्लिंग असे म्हणतात.हे राम्ब्लिंग त्या त्या वेळेनुसार त्या त्या भावनेनुसार वेगळ
असु शकत.हत्तींच्या व्यक्त होण्याचे विविध प्रकार आहेत. हत्ती नेहमी पाय आपटून
७ किलोमीटर परिघात एकमेकांशी संवाद साधू शकतात,तर हत्तींणी मात्र सतत आवाजाच्या मध्यमातून संवाद साधतात. त्यातलाच रम्ब्लिंग हा
एक प्रकार. आणि हेच रम्ब्लिंग करून आनंदजी उत्तमरीत्या हत्तींशी संवाद साधतात.त्यासाठी
त्यांनी दिवसाचे १०-१० , १२-१२ तास हत्तीन्सोबत घालवले.ते समजून घेऊन त्याचा
अभ्यास केला. पण इतकच पुरे नसत, त्याला जोड म्हणून तेवढ्याच उत्कट आणि आपलेपणाच्या
भावनेचीही गरज असते. ते म्हणतात ना, गाण शिकाल...पण सूराच काय? हा सुर गवसायला कठिण
साधना लागते, अन ती इतकी सहज शक्य होत नाही. संपूर्ण आयुष्य द्याव लागत. हत्तींना
समजून घेताना त्यांच मन वाचाव लागत.त्यांच्या भावना उत्कट आणि तीव्र असतात.ते जर
समजल तर हत्ती समजून घेण आणि निसर्गचक्रातल त्याच अढळ स्थानही आपल्याला कळेल. असे
आनंदजी सांगतात. हत्तींना समजून घेण सुरुवातीला कठीण होत, पण लॉरेन्स ॲन्थनी, डॉ.
डेफनी शेल्ड्रिक, इयान डग्लस या सारख्या हत्ती अभ्यासकांमुळे हत्ती सखोल समजून
घेता आला.
आनंदजी आणि हत्ती याचं नात काय आहे हे कधी प्रत्यक्ष पहायला
मिळणे म्हणजे सुवर्ण योग असतो.कारण तुम्ही अचानक ओळख नसताना हत्तीजवळ गेलात तर तो
बिथरतो,चिडतो.त्यापेक्षा हळुवारपणे त्याला समजून घेत,जरा वेळ देत त्याच्या जवळ
जाणे सुखद असते. आनंदजी आणि हत्ती यांच्या नात्याविषयी जरा एक आठवण सांगतो.
मध्यंतरी आनंदजी सोबत एका जंगलात हत्तींना भेटायला जायचा योग आला. त्यांची गाडी
पुढे होती आणि आमची मागे. बरेच पुढे गेल्यावर ती जागा आली जिथे हत्ती जंगलात होते.
रस्त्यावर आनंद्जींची गाडी थांबली,त्यापाठोपाठ आम्ही पण गाडी थांबवली. गाडी जिथे थांबली त्या जागेपासून जंगलात जिथे
हत्तींचा कळप होता ती जागा अंदाजे पाचशे मीटर वर असेल.पण आम्ही गाडीतून खाली उतरतो
तर काय ऐकतोय, आनंदजी गाडीखाली उतरताच पाचशे मीटरवर असलेले सगळे हत्ती जोरजोराने
ओरडायला लागले होते. सुरुवातीला मला ते कळलेच नाही पण आनंद्जींच्या जवळ जाताच ते
म्हणाले कि , “ मी आलोय हे त्यांना कळले आहे , आणि म्हणून ते आवाज करून माझ स्वागत करताहेत. ” आणि इतक बोलून ते फक्त
मोठ्याने म्हणाले” हो हो..,मी आलोय बाळांनो.”
काय कमाल आहे ना...आनंदजी साधरण अर्धा किलोमीटर असताना ह्या हत्तींना ते
आल्याचे कळले. कुठला दुवा असेल कि जो दोघांनाही एका धाग्यात बांधतो. आनंदजी ,
श्रिया वहिनी आणि मी असे तिघे हत्तीच्या
कळपाजवळ गेलो,,आणि आणि मग ह्याचं बोलण आणि कुणाचे रुसणे ,रुसून दूर जाणे, तक्रार
करणे सुरु झाले,,कुणी सोंड हलवत होत तर कुणी तक्रार करत होत. हे सगळ प्रत्यक्ष
बघणे हेच बर होत..कारण त्याबद्दल व्यक्त होताच येत नाहीय.
आपल्या गरजेनुसार
तिरक्या चालणाऱ्या माणसांच्या जगात
हत्ती मात्र एका सरळ रेषेत, उत्तर ते दक्षिण किंवा दक्षिण
ते उत्तर चालत जातो,त्याला दिशा
उत्तम कळते. हत्तीं हे नेहमी कळपानेच राहतात आणि हा कळप या सरळ मार्गानेच प्रवास
करत असतो. हत्तीची बुद्धी अतिशय तल्लख असते, एखाद्या व्यक्तीला एकदा बघितले कि तो
कधीच त्याला विसरत नाही.बरीच वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच्या समोर
गेलात तरी तो तुम्हाला ओळखतो..हत्ती अतिशय भावनिक प्राणी आहे..प्रेम,जिव्हाळा,राग,तिरस्कार
या सगळ्याच भावना त्याच्या वागण्यातुन प्रकट होतात. पण या सगळ्या भावना
तुमच्याकडून येणाऱ्या क्रियेच्या प्रतिक्रिया असू शकतात. तुम्ही त्याच्याशी कसे
वागता हे जास्त महत्वाचे.
हत्ती आपल्या पिल्लांना खुप जपतात. एखाद पिल्लू त्याच्या
आईपासून हरवलं किंवा दूर झाल तर त्याच्या जगण्याचे प्रमाण ५०% असते. मग हत्तीच
पिल्लू कस जगू शकत.?हत्ती सतत कान का हलवत असतात?त्यांचे कान सुपासारखे का असतात?
त्याची त्वचा कशी असते? हत्तीणीच्या बाळंतपणाचा कालावधी किती असतो? हत्ती
निसर्गाच्या साखळीत अत्यंत महत्वाचे स्थान कसे बजावतो? दोन हत्ती एकमेकांशी कसे संवाद
साधतात? त्यांची संवादाची पद्धत काय /जगभरात
हत्तीचे किती प्रकार होते ? त्यापैकी आज किती कायम आहेत? एखाद्या विशिष्ट वेळी हत्तीच वागण असच का असेल ? हत्तींची
दिनचर्या..त्याचं खाण-पिण कस असत ? डोक्यात साठवलेलं ज्ञान आणि माहिती एका
पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करण्याची कला , त्याच्या धिप्पाड शरीराविषयी
माहिती आणि अशी अत्यंत सखोल आणि महत्वाची
पण रंजक माहिती आपल्याला आनंद शिंदे या हत्तीमित्र आणि हत्ती अभ्यासाकाकडून नक्की
मिळेल.
२०१४ साली आनंदजींनी “ Trunk Call
– The Wildlife Foundation ” या संस्थेची स्थापना
केली.जी वन्यजीवांसाठी काम करते.आणि जी संस्था नेहमी वन्यप्रान्यांसाठी अग्रेसर
असते. अनेक सेवाभावी सहकाऱ्यांचे हाथभार याला लाभतात. या संस्थे अंतर्गत आनंदजींनी
हत्ती आणि वन्यप्राण्यांसाठी बरेच कार्य केले आहे. हत्ती आणि प्राण्यांसाठी
त्यांना अजून बरेच महत्वाकांक्षी आणि गरजेचे उपक्रम करायचे आहे. ज्यासाठी
सर्वांच्या मदतीची गरज भासेल.
हत्ती जगला पाहिजे या ध्येयाला मनात ठेवून चालणाऱ्या
आनंद्जींना त्यांच्या कार्यासाठी वाईल्ड लाईफ कार्यासोबत पत्रकार म्हणून केलेल्या
कामासाठी पण अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे.
आनंदजी आणि हत्ती यांचा शब्दांच्या पलीकडचा संवाद समजून
घेताना एक मात्र लक्षात येत की, विशाल हत्तीच मनही तेवढंच विशाल आणि उदार असत.गरज
आहे ती आपण त्याला समजून घेण्याची.गरज आहे त्याच्याकडून अजून बरच काही शिकण्याची,किमान
माणसामध्ये हरवत चाललेली माणुसकी तरी शिकण्याची. आनंदजी म्हणतात “ हत्तींनी मला
माणूस केल. त्यांनी जगण शिकवलं. शब्दांमध्ये न अडकता डोळ्यांनी व्यक्त होत संवाद
साधता येतो हे शिकवलं.हत्ती बोलतात, आपण किमान ऐकून,समजून घेण्याची तयारी
ठेवावी...
अमोल तु अतिशय छान उपक्रम हाती घेतला आहे त्यासाठी तुझे अभिनंदन.
ReplyDeleteआनंद शिंदे यांच्या हत्ती प्रेमाची गोष्ट फार छान सांगितली. हत्ती चे जीवन समजून घेण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.त्यांना माझा सलाम. अतिशय माहितीपूर्ण लेख आहे.आता पुढच्या अवलिया ची माहिती वाचायला उत्सुक आहे.तुला मनापासून शुभेच्छा.
ज्योत्स्ना मुळावकर.
Thank you Kaku.
ReplyDeleteKhup Chan sir ya madhe je sangitl ahe te real madhe ghadun ale ahe I am proud my school
ReplyDeleteThank you Sir, pan tumhi comment bahutek wrong post var keli ahe,,hi comment Thoda thode ki jarurat hai ya post var kara...Thank you.
ReplyDeleteThis was great to read thank you.
ReplyDelete